जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. मंदिराच्या दानपेटीत हेच भाविक भरभरून दान टाकतात. त्याची मोजणी करण्यासाठी आज पेट्या उघडण्यात आल्या आहेत. अंदाजे १० ते १२ लाख रुपये दान पेटीतून निघतील, अशी माहिती विश्वस्त नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे.