विरार-वसई येथील म्हाडा- १२ वसाहती(पश्चिम) मध्ये काही दिवसांपूर्वी श्वानाचे पिल्लू इलेक्ट्रिक पाईप लाईनमध्ये अटकले होते. तेथे खेळणाऱ्या लहान मुलांच्या लक्ष्यात येताच लहान मुलांनी ही बाब अग्निशमन दलाच्या निदर्शनात आणून दिली. त्यानंतर २ तासांच्या बचाव मोहिमेनंतर त्या पिलाची सुखरूप सुटका करण्यात आली.