इरफान पठाण देशात १०० प्रशिक्षण केंद्रे सुरू करणार, पनवेलमध्ये ३३ व्या केंद्राचे उद्घाटन

2022-12-24 2

माजी आंतरराष्ट्रीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण यांच्या क्रिकेट अकादमी ऑफ पठाणचे ३३वे केंद्र पनवेलमधील कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीमध्ये सुरू करण्यात आले. या अकादमीमध्ये तंत्रज्ञान, ऑन-ग्राउंड अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय क्रिकेट तज्ज्ञांनी डिझाइन केलेल्या मॉडेलद्वारे विद्यार्थ्यांना क्रिकेटचे धडे शिकवण्यात येणार आहेत. क्रिकेट अकादमी ऑफ पठाण संपूर्ण देशभरात १०० पेक्षा अधिक केंद्र सुरू करणार असून क्रिकेटपटूंचे व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याची प्रतिक्रिया इरफान पठाण यांनी दिली आहे.

Videos similaires