भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. याच अपघाताविषयी जयकुमार गोरे यांचे वडील वडील भगवान गोरे यांनी शंका उपस्थित केली आहे. "जयकुमार गोरे जयकुमार गोरे यांची प्रकृती सध्या उत्तम आहे. काळजी करण्याचे काही कारण नाही. अपघात कसा झाला याबाबत मला कल्पना नाही. मात्र रस्त्यावर रहदारी नसताना अपघात कसा होतो? मला शंका येत आहे. मी अपघाताच्या ठिकाणी गेलो होतो. तेथे अपघात होण्यासारखे काहीही नाही. आमदार जयकुमार गोरे यांनी मला अपघात कसा झाला, याबाबत माहिती दिलेली नाही. हा अपघात फलटणमध्येच घडला. त्यामुळे याबाबात मला शंका येत आहे. माझा कोणावरही संशय नाही," असे जयकुमार गोरे यांचे वडील भगवान गोरे म्हणाले आहेत.