जयकुमार गोरे यांची प्रकृती उत्तम, माझ्याशी हसत-हसत बोलले- तानाजी सावंत

2022-12-24 17

भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अधिकची माहिती दिली आहे. जयकुमार गोरे यांची प्रकृती उत्तम आहे. काही घाबरण्याचे काहीही कारण नाही. जयकुमार गोरे माझ्याशी हसत हसत बोलले आहेत. त्यांची तब्येत चांगली असून आठवड्याभरात त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर आणले जाईल, अशी माहिती तानाजी सांवत यांनी दिली.

Videos similaires