भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे भीषण अपघात झाला. साताऱ्यातील फलटण तालुक्यातील मलटण गावच्या हद्दीतील तब्बल ५० फुट खोल दरीत गाडी कोसळल्याने हा अपघात झाला आहे. गाडीत आमदार गोरे यांच्या सह चौघेजण प्रवास करत होते. गोरेंवर पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
#JaykumarGore #CarAccident #phaltan #satara #bjp #RubyHallClinic #pune #SataraManAssembly #lonand #PhaltanRoad #satarapolice #road #transport #hwnewsmarathi