राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत चुकीचा शब्द वापरल्याने एकच गदारोळ पाहायला मिळाला. जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उद्देशून 'निर्लज्जपणा बंद करा' असे विधान केले.या प्रकरणी जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. याचा निषेध म्हणून विरोधक आमदारांनी विधिमंडळासमोर जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. यावेळी