Pune:अमृता फडणवीसांच्या 'त्या' विधानाच्या निषेधार्थ पुण्यात महिला काँग्रेसकडून आंदोलन

2022-12-22 2

भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी 'महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता आहेत' असे विधान केल्याने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज पुण्यातील डेक्कन येथील गुडलक चौकात त्यांनी आंदोलन केले. पुणे शहर महिला काँग्रेसच्या पूजा आनंद यांच्या नेतृत्वाखाली अमृता फडणवीस यांच्या फोटोला 'जोडे मारो आंदोलन' करण्यात आले.'अक्कल कमी जीभ लांब' अशा घोषणा देत अमृता फडणवीस यांच्या विधानाचा महिला काँग्रेसने निषेध नोंदविला.

(रिपोर्टर: सागर कासार)

Videos similaires