दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने ४४ वेळा फोन आले होते. या ‘एयू’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा होतो, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी काल लोकसभेत केला होता. यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपाचे नेते नितेश राणे यांहीही आता या प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आदित्य ठाकरेंनी नार्को चाचणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.