नशामुक्तीच्या मुद्द्यावरून बोलताना Harsimrat Kaur Badal यांची Bhagwant Mann यांच्यांवर टीका

2022-12-21 10

जी व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत संसदेत यायची, तीच आता आमचे राज्य चालवते आहे, अशी टीका शिरोमणी अकालीदलच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर केली आहे. मंगळवारी संसदेत नशामुक्तीच्या मुद्द्यावरून बोलताना त्यांनी पंजाबमधील आप सरकार जोरदार निशाणा साधला.“एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री अशा प्रकारे वागत असेल, तर त्या राज्याची अवस्था काय होईल? याची कल्पना न केलेलीच बरी, अशी टीकाही कौर यांनी केली. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी ‘मद्यप्राशन करून गाडी चालवू नका’,अशा प्रकारचे फलक लावले आहेत. मात्र, आमचे मुख्यमंत्री मद्यपान करून राज्य चालवत आहेत”, असे त्या म्हणाल्या.

Videos similaires