'नागपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने सतरा वर्षांच्या तरुणीला आई-वडिलांसमोर प्राण सोडावे लागल्याची घटना दुर्दैवी, सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसे व्हेंटीलेटर उपलब्ध करण्यात यावेत, ते चालू राहतील याची दक्षता घेण्यात यावी. रुग्णालयांमध्ये औषधे व इतर सामग्री उपलब्ध ठेवावी' अशी सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यसरकारला केली.