विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून दिवसाची सुरुवातच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या घोषणाबाजीने झाली. श्रद्धा वालकर प्रकरणात 'आत्तापर्यंतच्या तपासात या प्रकरणात कोणत्या राजकीय किंवा बाहेरच्या व्यक्तीचा दबाव आढळून आलेला नाही. मात्र, तिने तक्रार परत का घेतली, याची चौकशी आपण करत आहोत' तर 'लव्ह जिहाद'बद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, 'वेगवेगळ्या राज्यांनी याबाबत जी भूमिका किंवा कायदे केले आहेत, त्यांचा अभ्यास करून आपल्याकडे यासंदर्भात प्रभावी कायदा करण्याची गरज असेल, तर तो करण्याची राज्य सरकारची मानसिकता आहे' असे वक्तव्य फडणवीसांनी केले.