हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राजकीय वातावरण तापले असताना आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, 'आज आम्ही सर्व विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं असं पहिल्यांदाच झालं की एका राज्याचे मुख्यमंत्री एवढे घाबरतायेत,काहीच बोलत नाहीयेत.स्वतःचा कार्यक्रम रेटायच्या मूडमध्ये ते आहेत. हे घटनाबाह्य सरकार आहे'