विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून दिवसाची सुरुवातच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या घोषणाबाजीने झाली. दोन्ही बाजूंनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर एकमेकांविरोधात घोषणाबाजी करून आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे आज दिवसभरात कामकाज वादळी होणार हे दिवसाच्या सुरुवातीलाच स्पष्ट झालं. अजित पवारांच्या टीकेला उत्तर देताना 'तुमचे सरकार असताना माझ्या मतदारसंघातील कामं तुम्ही रोखली होती' असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले. #rashtravadicongress