अधिवेशनानंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्यावर आज महाराष्ट्र एकीकरण समितीने एका आंदोलनाचे आयोजन केले होते. लोकशाही मार्गाने आंदोलन होते परंतु कर्नाटक सरकारने त्यासाठी परवानगी दिली नाही. आपल्या इथूनही काही नेते तिथे जाऊ इच्छित होते, त्यांनाही परवानगी दिली गेली नाही"