गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला महाविकास आघाडीचा महामोर्चा आज मुंबईत निघाला असून त्यामुळे शहरातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख यांनी या मोर्चामध्ये झालेल्या सभेदरम्यान उपस्थिती लावून भाषण केले.यावेळी त्यांनी, 'संयुक्त महाराष्ट्राच्या वेळला झालेली घोषणा अजून पूर्ण झालेली नाही, बेळगाव,निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र आम्ही घेऊन दाखवणार स्वतःला बाळासाहेबांचे विचार म्हणवणारे तोतये आहेत. बाळासाहेबांचे सैनिक खुर्चीसाठी कधीच दिल्लीसमोर लाचार होत नाहीत' अशा पद्धतीने टीका करून शिंदे,भाजप आणि राज्यपालांवर निशाणा साधला