महाविकास आघाडी तर्फे मुंबईमध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना तसेच महाविकास आघाडीचे घटक पक्ष देखील सहभागी होणार आहेत.यावेळी कार्यकर्त्यांसह ठाण्यातील ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे ठाणे स्टेशनहुन रेल्वेने मुंबईकडे रवाना झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे हेसुद्धा कार्यकर्त्यांसह रेल्वेने रवाना झाले.