#news
Tic tok Star
चांगला अभिनय करायला चांगला चेहरा लागतो उंची लागते रंग लागतो चांगलं बोलता आलं पाहिजे चांगले कपडे घातले पाहिजेत पण टिक टॉक नंतर अभिनयासंदर्भातली ही सगळी गृहीतके मोडीत निघाली.. जन्मानं नशिबी आलेलं व्यंग.. स्पष्ट बोलता येत नव्हतं..तासभर उन्हामध्ये उभा राहणं सुद्धा ज्याला मुश्किल होत.. असा तरुण स्वतःच्या मोबाईलवर व्हिडिओ करू लागला आणि रातोरात सुपरस्टार बनला.. वेब सिरीज च्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर जाण्याच स्वप्न पाहणाऱ्या याच सुपरस्टार संतोष मुंडेच अपघाती मृत्यू झालय.. संतोष मुंडे वय वर्ष 35 बीड जिल्ह्यातल्या डोंगरात वसलेल्या धारूर जवळच्या भोगलवाडी गावात संतोष मुंडेंचा जन्म झाला वडील निवृत्त सैनिक आहेत..अभिनयाची आवड असलेल्या संतोषची ओळख सगळीकडे संत्या म्हणूनच होती..घरात कुठलाही अभिनयाचा वारसा नासल्यानेल्या संतोष ने टिक टॉक सुरू झालं आणि व्हिडिओ करायला सुरुवात केली..आणि तिथूनच टिक टॉक वरील व्हिडिओच्या माध्यमातून घराघरात पोहोचला..