गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरुन कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांना गहिवरुन आलं होतं.त्या म्हणाल्या, 'तो दिवस अजून आठवतो. त्या दिवशी असा अभद्र फोन येईल असं वाटलं नव्हतं. लोकं आपल्या आवडत्या नेत्याच्या चितेत उड्या घ्यायला तयार होती'