माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. मात्र, उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर सीबीआयने या जामीनाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याचं न्यायालयाला सांगितलं. यासाठी १० दिवसांचा स्थगिती या निर्णयावर द्यावी अशी मागणी सीबीआयने केली. न्यायालयाने हे म्हणणं ऐकून घेत या निर्णयाला स्थगिती दिली असल्याने जामीन मंजूर झाला असला तरी देशमुख यांना तुरुंगातून मुक्त केलं जाणार नाही.
#AnilDeshmukh #BombayHighCourt #MumbaiHighCourt #HighCourt #SupremeCourt #ED #CBI #Bail