आज मोदींच्या हस्ते नागपूरमध्ये समृद्धी महामार्गाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला तुम्हाला निमंत्रण नव्हतं का? असा प्रश्न एका प्रतिनिधीने विचारला त्यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, 'त्या कार्यक्रम पत्रिकेत माझं नाव नाही, पण मला आमंत्रण आलं आहे.या रस्त्यामुळे अनेक गाव जोडणारा,वेळ वाचणार, इंधन बचत होणार आहे.आमच्या सरकारने आधीच्या काळातही समृद्धी महामार्गाला मदत दिली'