भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत, पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. माझ्यावर झालेली शाईफेक हा भ्याडपणा असून हिंमत असेल तर समोर या, असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे