"महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती' असं वक्तव्य केल्यामुळे भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर चोहीबाजूने टीका झाली. अखेर, कुणाच्या भावना दुखावल्या असतील दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे, असं म्हणत पाटील यांनी आपल्याच विधानावरून यू-टर्न घेतला.
राज्यात वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरूच आहे. आता भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. विरोधकांनी आणि सोशल मीडियावर चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरून तीव्र संताप व्यक्त केला. पण, आज चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा खुलासा केला आहे."
#ChandrakantPatil #BJPMaharashtra #Maharashtrapolitics #marathinews #Breakingnews #Maharashtranews #mahapolitics #hwnewsmarathi