राज्यातील शेतकरी संकटात आहे. मात्र राज्य सरकारला शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यात फार रस नाही. त्यामुळेच छत्रपती शिवरायांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) भाजप नेत्यांकडून वारंवार चुकीची वक्तव्य करून जनतेचं लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजपच्या इतर नेत्यांनी केलेली वक्तव्यं याच मालिकेतील असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे.
#AmolMitkari #DevendraFadnavis #EknathShinde #BJP #TanajiSawant #BalasahebanchiShivsena #Politics #NCP #MahavikasAghadi #MVA #Maharashtra #Karnataka