आज गुजरात आणि हिमाचल प्रदेश यांच्या विधानसभांचे निकाल स्पष्ट होत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना संजय राऊत म्हणाले की,'दिल्ली महानगरपालिका जिथे भाजपाची १५ वर्षाची सत्ता होती ती 'आप'ने खेचून घेतली .१५ वर्षांची सत्ता भाजपाकडून खेचून घेणे हे सोपे नाही.गुजरातचा निकाल येतोय तो अपेक्षित आहे पण दिल्ली 'तुम्हाला घ्या गुजरात आम्हाला द्या' अशी शंका उपस्थित केली जातेय'