हवेच्या प्रदूषणात दिल्ली आघाडीवर असलेली पाहायला मिळते, मात्र आता दिल्लीप्रमाणे मुंबईच्या हवेची परिस्थिती ढासळताना पाहायला मिळतेय. मुंबईत समुद्री वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळे वाऱ्यातील धुलीकणांचे प्रमाण वाढलंय. मुंबईच्या हवेचा निर्देशांचे ३०९ असा नोंदवण्यात आलाय आणि ही गुणवत्ता अत्यंत वाईट असल्याचं बोललं जातंय.