कर्नाटक सीमेवर कन्नड रक्षण वेदीकेच्या गुंडांनी महाराष्ट्राच्या बसेस आणि ट्रक फोडल्याने महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांचा बेळगाव दौरा रद्द करण्यात आला. यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आपण स्वत: बेळगावमध्ये जाऊ, असा इशारा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, पवारांच्या इशाऱ्यानंतर आता वर्षा बंगल्यावरील हालचालींना वेग आला आहे.
#SharadPawar #EknathShinde #VarshaBungalow #JitendraAwhad #MaharashtraKarnatakaBorderDispute #Kannada #Belgaon #ChandrakantPatil #NCP #Shivsena #BJP #hwnewsmarathi