छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून चांगलच तापलेलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानानंतर भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. आता भाजपचे नेते केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याने वाद पुन्हा पेटण्याची चिन्ह आहे.