'काय ते अगाध ज्ञान!'; Prasad Lad यांच्या शिवरायांवरच्या विधानावर Amol Kolhe यांची प्रतिक्रिया

2022-12-04 0

'काय ते अगाध ज्ञान! इतिहासाला कोड्यात टाकणारा हा इतिहास! वा गुरूजी, जन्म कोकणातील, स्वराज्याची शपथ रायगडावर, बालपण रायगडावर!.अध्यक्ष महोदय,माझी विनंती आहे की अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे इतिहासाचे दाखले देण्यास एकतर मनाई करावी किंवा अशा व्यक्तींना इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून किंवा कोणत्याही शिवभक्ताकडून विशेष प्रशिक्षण देण्यात यावे.. अन्यथा आम्हाला तरी सांगावे की हा इतिहास कुठे शिकावा, कुणी सांगावा?' अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रसाद लाड यांच्या शिवरायांवरच्या विधानावर दिली.