गेल्या काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन राज्यभरात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही या विधानाचा निषेध करत कारवाईची मागणी केली होती. आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही कोकण महोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अजब वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. यावरुन राष्ट्रवादीकडून टीका करण्यात आली आहे.
#BhagatSinghKoshyari #SudhanshuTrivedi #ShivajiMaharaj #ChhatrapatiShivajiMaharaj #PrasadLad #BJP #RajThackeray #NCP #AmolMitkari #PravinDarekar