'माझ्या अमृत महोत्सव सोहळ्यासाठी एकाच दिवशी २८ विमानं सोलापूरच्या विमानतळावर उतरली होती.त्यावेळी चिमणीचा कधीच अडथळा जाणवला नव्हता.मात्र,आत्ताच चिमणीचा विषय का गाजतो आहे?' असा सवाल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला त्याचबरोबर 'होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरु करण्यासाठी सोलापूरच्या जाणकार व्यक्तींनी खासगी विमान कंपन्यांशी संवाद साधावा' असा सल्लाही त्यांनी सोलापूर विमानतळ वादावर दिला.