'दिवार' चित्रपटाप्रमाणे बंडखोरी करणाऱ्या नेत्यांच्या डोक्यावर 'गद्दार' कोरले जाईल आणि याचा त्रास त्यांना पिढ्यानपिढ्या होईल, अशी टीका संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यावर केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार संजय गायकवाड यांनी राऊतांसाठी अपशब्द वापरले.