भाजप नेते मंगलप्रभात लोढांच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर राजकीय नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्यात. या वाचाळवीरांना आवरा, अशा शब्दात अजित पवारांनी भाजप श्रेष्ठींना सल्ला दिलाय.जणू काही चढाओढ लागलीए, असं म्हणत अजितदादांनी लोढांचा समाचार घेतला वादग्रस्त विधानं चुकून नाही तर व्यवस्थित नियोजन केली जात असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली.शिवप्रताप दिन सोहळ्यातील भाषणात लोढांनी शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्राच्या सुटकेशी केली होती.