राज्याबाहेर गेलेले सगळे प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच राज्याबाहेर गेल्याचा दावा शिंदे गट आणि भाजपाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा दावा केला आहे. यासाठी त्यांनी माहिती अधिकारात मिळवलेलं एक पत्रच पत्रकार परिषदेत वाचून दाखवलं.'खोके सरकार जनतेशी खोटे का बोलतेय?' असा सवालही त्यांनी केला.