छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात स्वराज्य संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धोतरावर सही करून अनोख्या पद्धतीने हे निषेध आंदोलन करण्यात आले.'राज्यपाल हटवा, स्वाभिमान वाचवा' अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.