मध्य रेल्वेच्या मार्गावरील तब्बल 27 तासांच्या जम्बोब्लॉकला सुरुवात झाली आहे. कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे लोकलसह एक्स्प्रेस ट्रेनवरही परिणाम होणार आहे. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. अनेक लोकल गाड्या, एक्स्प्रेस गा्डया रद्द करण्यात आल्या आहेत.