काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील बुलढाण्यात दाखल झाली. याचवेळी सभेत राहुल गांधी शेतकरी आत्महत्येवर आणि श्रद्धांजलीपर बोलत असताना अचानक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यामुळे सभेत एकच खळबळ उडाली. हा सभा उधळून लावण्याचा प्रयत्न होता का? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केल्या जात आहे.