News Report By Arti Ghargi - काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातला आजचा शेवटचा दिवस आहे. ७ नोव्हेंबर ला हि यात्रा तेलंगणा मधून महाराष्ट्रात आली. त्यानंतर नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला आणि आता बुलढाणा अश्या ५ जिल्ह्यातून पादाक्रांत करत संपन्न झाली. या १०-१२ दिवसात राहुल गांधी समाजातील अनेक घटकांना भेटले, त्यांच्याशी बातचीत केली. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे, हि काँग्रेस ची रॅली जरी असली तरी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांच्याशिवाय महाविकास आघाडीचे नेतेही या यात्रेत सहभागी झाले होते. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार शिवसेनेचे आदित्य ठाकरे, सचिनआहिर यांनी या यात्रेत सहभागी होऊन महा विकास आघाडी चा पाठींबा यात्रेला दर्शवला . हि यात्रा २ टप्प्यात पार पडली. यात्रेचा पहिला टप्पा HW news च्या टीमने आणि मी स्वतः कव्हर केला आहे. त्यामुळे आज यात्रेच्या शेवटच्या दिवशी नक्की राहुल गांधींनी आणि काँग्रेसने या यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रात काय साध्य केले या विषयाबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्याचबरोबर भारत जोडो यात्रेतील काही निरीक्षणे सुद्धा या व्हिडिओतून आम्ही मांडणार आहोत.
#RahulGandhi #BharatJodoYatra #VeerSavarkar #IndiraGandhi #Congress #Letter #Maharashtra #AshokChavan #NanaPatole #BharatJodo