काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी स्वा.सावरकर यांच्याबद्दल भारत जोडो यात्रेत वादग्रस्त विधान केल्याने राज्यातील भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांना आक्रमक झाले आहे.त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील सारसबाग येथील सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर आनंद दवे आणि सात्यकी सावरकर यांनी सामुदायिक पद्धतीने सावरकर लिखित जयोस्तुते गीताचे पठण केले.