भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वक्तव्य केल्याने वाद झाला आहे. त्या वक्तव्याचा भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना निषेध नोंदवत आहे. आज सारसबागेसमोर स्वा. सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करताना अचानक एका महिला कार्यकर्तीने पायातील चप्पल सावरकरांच्या फोटोवर उगारली.