पुण्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा 'मुलगी वाचवा' अभियानाच्या धर्तीवर अनोखा उपक्रम सुरू आहे. या हॉस्पिटलमध्ये मुलीचा जन्म झाल्यावर सर्व वैद्यकीय सेवा मोफत पुरवण्यात येते. मुलीच्या जन्मानंतर केक कापून, फुलं उधळून हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांकडून सेलिब्रेशन केले जाते.