अंधेरी पोटनिवडणुकीत NOTA साठी नोटांचं वाटप?, ठाकरे गटाचा गंभीर आरोप | Andheri East Bypoll Elections

2022-11-03 76

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या (Andheri East Assembly By-Election) जागेवर आज पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला दिवसभरात मतदारांनी अत्यंत अल्प प्रतिसाद दिला. अंदाजे साधारण 30 टक्के मतदान झाले. मात्र, अगदी शेवटचे काही तास शिल्लक असताना मतदान प्रक्रियेत वाद झाला. हा वाद म्हणजे भाजप कार्यकर्त्यांकडून नोटाचा प्रचार होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी केला आहे. यासंदर्भात महिला कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे देखील माहिती दिल्याचे त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधींना सांगितले आहे.

#RutujaLatke #ShivSena #AndheriEast #Election2022 #UddhavThackeray #Matoshree #MurjiPatel #AdityaThackeray #ShivSena #AnilParab #YuvaSena #BMC #EknathShinde #BJP #Maharashtra

Videos similaires