गेल्या काही दिवसापासून आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात पेटलेला वाद मिटवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण हा वाद मिटणार की चिघळणार याबाबत राणा आणि बच्चू कडू या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद देऊन स्पष्टीकरण दिलंय. यामध्ये रवी राणा यांनी ५० खोके आणि गुवाहाटी दौऱ्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून आपले शब्द मागे घेतलेत आणि दिलगिरी व्यक्त केली. पण बच्चू कडू यांचा मात्र वेगळाच सूर असल्याचं दिसून आलंय.
#BacchuKadu #RaviRana #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #Prahar #Shivsena #Guwahati #Amravati #Prahar #NavneetRana #HWNewsMarathi