भाजप नेते किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. केवळ एक प्रकरण नाही, तर SRA च्या अनेक प्रकरणांमध्ये किशोरी पेडणेकर यांनी घोटाळा केल्याचं किरीट सोमय्या म्हणाले आहेत. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं आहे. किशोरी पेडणेकर यांना पुन्हा एकदा दादर पोलिसांनी SRA घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
#KishoriPednekar #KiritSomaiya #BJP #Maharashtra #UddhavThackeray #Covid #Scam #AadityaThackeray #BMC #Mayor #Mumbai #ShivSena #HWNews