रवी राणांनी गुवाहाटीचा उल्लेख करत टीका केल्यानंतर बच्चू कडूंची पोलिसांत तक्रार
2022-10-24 7
अमरावतीत आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा या दोन आमदारांमध्ये वाद पेटला आहे. बच्चू कडूंनी गुवाहाटी जाऊन पैसे घेतले, असा आरोप राणांनी केला होता. त्यानंतर कडूंनी आज अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात आमदार रवी राणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.