सांगलीतील कडवेगावचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. ज्यात एका तरुणाने RTO अधिकाऱ्यांसमोर कपडे काढून आंदोलन केले. या तरुणाच्या म्हणण्यानुसार गाडी पासिंगसाठी त्याने कुठल्याही एजंटला पैसे दिले नाहीत, स्वतः कागदपत्रे गोळा करून RTO कार्यालयात सादर केली, तरी त्याची गाडी पासिंग केली नाही. अधिकारी एजंटच्या मदतीने गाडी पासिंग करून देतात, असा आरोप या तरुणाने यावेळी केला.