मुलायम सिंह यादव... राजकीय आखाड्यातले मोठे पैलवान... राजकीय वर्तुळात कायम त्यांची हीच प्रतिमा होती. ते विरोधकांना चितपट करण्यात माहीर होते. उत्तर प्रदेशच्या राजकारणात त्यांनी मिळवलेलं यश हे कुठल्याही नेत्याचं जणू स्वप्नच असतं. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत तीन वेळा उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली तर देशाचे माजी संरक्षणमंत्री म्हणूनही काम पाहिलंय. परंतु याच मुलायम सिंह यादवांना दोनवेळा पंतप्रधानपदाची नामी संधी आलेली पण ती थोडक्यात हुकली. आता हे प्रकरण नेमकं काय? समजून घेऊयात याच व्हिडीओतून...
#mulayamsinghyadavdeath #mulayamyadavdies #akhileshyadav