Nashik Bus Accident 11 प्रवाश्यांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

2022-10-08 121

नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. पहाटेच्या सुमारास बसमधील अनेक प्रवासी झोपेत असतानाच काळाचा घाला आला. खाजगी बसला आग लागून 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही आग एवढी भीषण होती की काही वेळात झालेल्या स्फोटाने परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले. त्यानंतर घटनेची माहिती आगीसारखी शहरात पसरली. काहींनी खिडकीतून उड्या मारल्या, तर काही आगीतच होरपळले. ही बस यवतमाळकडून मुंबईकडे जात होती.. नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात झाला आहे.

#Nashik #Maharashtra #BusAccident #EknathShinde #SharadPawar #HWNewsMarathi