Digital Adda : 'शिवप्रताप गरुडझेप' : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक अविस्मरणीय थरारकथा

2022-10-04 5

प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा 'शिवप्रताप गरुडझेप' हा चित्रपट येत्या ५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा थरार चित्रित करण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि अभिनय अशी तिहेरी जबाबदारी डॉ. अमोल कोल्हे यांनी पेलली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, यतीन कार्येकर आणि अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी 'लोकसत्ता डिजीटल अड्डा'ला भेट देत दिलखुलास गप्पा मारल्या आणि चित्रपटाशी संबंधी प्रश्नांची उत्तरं दिली...

Videos similaires