शिवसेनेच्या दोन दसरा मेळाव्यांची सध्या चर्चा सुरू असतानाच इतर पक्षीय नेतेही यावर आपली मतं व्यक्त करत आहेत. भाजपाचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे किंवा कोणत्याही बाजूने आमंत्रण आले तर उपस्थित राहणार. मात्र ते मला आमंत्रण देणार नाहीत याची मला खात्री आहे, असे नारायण राणे म्हणाले. दरम्यान यावर शिवसेनेकडूनही राणेंना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
#NarayanRane #VinayakRaut #UddhavThackeray #ShivSena #DasaraMelava #ShivajiPark #BJP #Shivtirth #Dadar #BKC #Maharashtra